Home राजकीय देवेंद्र वेषांतर करून शिंदेंना भेटायचे : अमृता फडणविसांचा गौप्यस्फोट

देवेंद्र वेषांतर करून शिंदेंना भेटायचे : अमृता फडणविसांचा गौप्यस्फोट

0
49


नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देवेंद्रजी हे एकनाथ शिंदे यांना वेषांतर करून भेटायचे असा गौप्यस्फोट आज अमृता फडणवीस यांनी केला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्याने खळबळ उडाली आहे. अतिशय अनपेक्षीत घडामोडीतून शिंदे सरकार सत्तारूढ झाले आहे. हे प्रकरण नेमके शिजले कसे ? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण रात्री उशीरा देवेंद्र यांना भेटत होतो असे सभागृहात सांगितले आहे. याच प्रकरणी आता अमृता फडणवीस यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांना भेटायला जाण्यासाठी देवेंद्रजी वेशांतर करून जायचे. शिवाय देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, हे देखील आपल्याला आधीच माहित होतं, असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या या नवीन दाव्यामुळे नव्याने चर्चेला उधाण आले आहे.


Protected Content

Play sound