जळगाव, प्रतिनिधी | शहरात आज दुपारी २.०० वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे समता नगराकडून वाहत येणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला होता. तसेच संभाजी नगर, विवेकानंद नगर, किसनराव नगर मधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. पुराच्या पाण्याचा लोंढा मोठा असल्याने ते थेट नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याने आणि त्यांच्या घरात चिखल गेला होता. तर याच गल्लीत पुरात एक चारचाकी गाडी देखील वाहून गेली होती. घरांमध्ये नाल्याचे पाणी आल्याने त्यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना आपला रोष व्यक्त केला.
रामानंद नगर उताराखालील असलेल्या विवेकानंद नगरमध्ये असलेल्या नाल्यास पावसामुळे मोठा पूर आला होता. सर्वात जास्त विवेकानंद नगर येथील बाल निकेतन शाळेला लागून असलेल्या नाल्यावर मोठा पूर आला होता. आजूबाजूच्या घरांमध्ये थेट पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. तर या रस्त्यावरील नाल्याचा पुल दोन्ही बाजूने खचला याबाबत आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी सायंकाळी विवेकानंद नगर तसेच श्रीधर नगर परिसरातील नाल्यांची पाहणी केली. हा नाला महापालिकेने व्यवस्थितपणे साफ केला नसल्याने या नाल्याला पूर आल्याचा आरोप तेथील रहिवाशांना केला. नाल्याचे पाणी घारांमध्ये शिरू नये, यासाठी येथील रहिवाशांनी लोखंडी जाळी बसवून देखील ते घरात शिरत असल्याने संताप व्यक्त केला. आयुक्तांनी केलेल्या पाहणीत नाल्याचा प्रवाहात अनेक बांधकामे आढळून आली. हे बांधकामे पाडण्याचे आदेश आयुक्तांनी बांधकाम अभियंता सुनील भोळे यांना दिले. आनंदनगर येथील नंदनवन कॉलनीत कडून येणाऱ्या पुलावरून एक तरुण वाहून गेल्याची माहिती आयुक्तांनी मिळाली या परिसराच्या पाहणीसाठी आयुक्त डॉ. टेकाळे व बांधकाम अभियंता सुनील भोळे गेले असता कॉलनीतील भयानक परिस्थिती समोर आली. बोरोले वस्तीगृहा जवळील नाल्यावरील पुलाचा भाग दोन्ही बाजूने खचलेला असल्याने आयुक्तांना पायी जाऊन पाहणी करावी लागली.