यावल प्रतिनिधी । ‘कोवीड-१९ ॲन ॲप्रोप्रिएट बिहेवीअर’ समितीवर डॉ. अतुल सरोदे यांची निवड झाल्याबद्दल आश्रय फाऊंडेशनच्या वतीने नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
आयसीएमआर आणि नॅशनल ॲकडमी ऑफ सायन्सच्या वतीने ‘कोवीड-१९ ॲन ॲप्रोप्रिएट बिहेवीअर’ गठीत करण्यात आलेल्या देशभरातील ख्यातमान डॉक्टर व वैज्ञानिक यांचा समावेश करण्यात आलेल्या समितीत डॉ. अतुल सरोदे यांचाही समावेश करण्यात आला आहे. डॉ. सरोदे यांच्या निवडीबद्दल आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्याहस्ते सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देवून सावदा येथे राहत्या घरी करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शैलेश खाचणे, डॉ. विलास पाटील, डॉ. पराग पाटील, डॉ. राजेश चौधरी, डॉ. भरत महाजन, डॉ. नितीन महाजन, डॉ. दिलीप भटकर, डॉ. अभिजित सरोदे, डॉ. निलेश पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ. प्रशांत भारंबे, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ.चेतन कोळंबे, डॉ. गौरव धांडे आदी कार्यकर्ते व पदधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.