यावल प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या र्डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांच्या उपस्थितीत भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे मिलिंद बोरघड़े, संतोष ठाकूर, अनिल पाटील, डी.डी. पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावल तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतच्या वतीने भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली, याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात बोराळे गावाचे उपसरपंच उज्जैनसिंग राजपुत, सदस्य रविंद्र वानखेडे यांच्याहस्ते डॉ .बाबासाहेबाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोराळे गावाच्या पोलीस पाटील माधुरी राजपुत ह्या होत्या. यावेळी भिम टायगर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार विकी वानखेडे यांनी केले व उस्थितांचे आभार आशा सेविका सुनयना राजपुत यांनी मानले. या प्रसंगी माजी सरपंच माया राजपुत, भारती राजपुत, ग्रामपंचायत सदस्य विमलबाई चौधरी, सरोजबाई राजपुत, संजु राजपुत, कैलाससिंग राजपुत यांच्यासह ग्रामस्थानी उपस्थित राहुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अपर्ण केली .