यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वढोदा गावच्या सरपंचपदाची यशस्वी धुरा सांभाळणालेल्या माजी सरपंच डॉ. प्रभाकर सोनवणे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल आणि चेतन अवधूत सोनवणे यांची पोलिस पाटीलपदी निवड झाल्याने विविध मान्यवरांचा उपस्थित सोमवारी ३० ऑक्टोबर सोमवार रोजी नागरी सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा परिषदचे गटनेते तथा यावल तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांची कन्या डॉ. रुपाली सोनवणे यांची ५ वर्ष ग्रामपंचायत सरपंच म्हणून समाज सेवा बरोबर एमपीएसचा अभ्यास करुन महाराष्ट्रात महिला प्रवर्गातून पहिल्या क्रमांकाने पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली तर त्यांचे बंधु कै.अवधुत सोनवणे यांचे सुपुत्र चेतन सोनवणे पोलिस पाटीलपदी निवड झाल्याने ३० आँक्टोबंर रोजी सायंकाळी ५.३० वाजता नागरी सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यस्थांनी जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, फैजपुर पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, सेवानिवृत्त डीवायएसपी राजेद्र रायसिंग ,दिलीप सुर्यवंशी , जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर सोनवणे, डोबंवली येथील किशोर कोळी, तहसिलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, गटविकास अधिकारी डॉ मजूंषा गायकवाड उपस्थीत राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन तंटामुक्तगाव समितीचे अध्यक्ष उत्तम सोनवणे, सरपंच संदिप सोनवणे, विकासो व्हाईस चेअरमन नरेद्र सोनवणे, उपसरपंच गोपाल चौधरी आदींनी केले आहे.