डॉक्टरांच्या रुपातील देव माणूस म्हणजेच डॉ.वैभव पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोविड काळापासून आपली वैद्यकीय सेवा डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयालयात सुरु करुन हजारो रुग्णाचे जीव वाचविणारे.. रुग्णांच्या हितास्तव अत्याधुनिक कॅथलॅब आणून हृदयविकारी रुग्णांना जीवनदान देणारे.. कठीणप्रसंगी रुग्णांना धीर देणारे.. रुग्णांसह नातेवाईकांचे समाधान होईस्तोवर शांतपणे मार्गदर्शन करणारे… रात्री-अपरात्री देखील आलेला फोन घेऊन सेवेसाठी तत्परता दाखविणारे…आजपावेतो अनेकांनी त्यांच्या रुपातून देवाला पाहिलेले असे गोदावरी परिवाराचे लाडके व प्रेमळ डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्यावर आज ३० ऑगस्ट रोजी मान्यवरांनी शब्दसुमनांसह पुष्पगुच्छांद्वारे शुभेच्छांचा व आशिर्वादाचा वर्षाव केला.

 

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयात आज हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवसानिमित्‍त केक कटिंग समारोह आयोजित केला होता. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्यासह संपूर्ण पाटील परिवार, फाऊंडेशनअंतर्गत येणार्‍या शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्या, प्राध्यापक, अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी आदि मोठ्या संख्येने उपस्थीत होते. सर्वप्रथम उत्सवमूर्ती डॉ.वैभव पाटील यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी विविध माध्यम समुहाचे अधिकारी व प्रतिनिधी देखील उपस्थीत होते. मान्यवरांनी मनोगताद्वारे डॉ.वैभव पाटील यांच्याबद्दलचे अनुभव व्यक्‍त करुन माणसाच्या रुपातील जणूकाही देवच आम्हाला लाभल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वांच्या उपस्थीतीत केक कटिंग समारोह पार पडला.

 

शस्त्रक्रिया महाअभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन

याप्रसंगी सत्काराला उत्‍तर देतांना डॉ.वैभव पाटील यांनी सर्वप्रथम उपस्थीतांचे आभार मानले.. आज रक्षाबंधन हा सण असून देखील सर्वांनी उपस्थीत राहून माझ्यावर प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल आभारी आहे. जे शिक्षण प्राप्‍त केले आहे त्याद्वारे रुग्णांवर उपचार करीत असून रुग्ण आनंदाने घरी जातांना जे समाधान लाभते ते शब्दात सांगता येत नाही. कुठलेली दुखणे असू द्या, ते अंगावर काढू नका, मग ते किरकोळ का असेना, तर वेळेआधीच डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्‍ला घ्या, येत्या १ सप्टेंबर पासून डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात शस्त्रक्रिया महाअभियान आयोजित केले असून त्यात येवून नक्‍कीच आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्या असे आवाहन डॉ.वैभव पाटील यांनी केले.

 

गोदावरी फाऊंडेशनसह माध्यमांद्वारेही वाढदिवसानिमित्‍त शुभेच्छांचा वर्षाव

गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी आई, अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, श्री व सौ अनिल पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील श्री व सौ.डॉ.सुहास बोरले यांच्यासह सुषमा पाटील, प्रमिला भारंबे, समृद्धी पाटील, श्रेया पाटील, इशिता पाटील, रुपाली चौधरी, अनिल भारंबे, योगिनी भारंबे, उर्विन भारंबे, निलीमा पाटील, उर्मिला पाटील, अस्मिता पाटील, सौरभ पाटील, किवा, सारा, राशी, रायना या चिमुल्यांसह संपूर्ण पाटील कुटूंबिय तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन एस आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.दिलीप पाटील, फिजीओथेरपीच प्राचार्या डॉ.जयवंत नागुलकर, राहूल गिरी, बालरोग तज्ञ डॉ.उमाकांत अणेकर, नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, सावदा स्कूलच्या प्राचार्या भारती महाजन, गोदावरी स्कूलच्या प्राचार्या निलीमा चौधरी, भुसावळ स्कूल येथील प्राचार्या अनघा पाटील, लेखापाल विभागातील विकास बेंडाळे, रमाकांत पाटील, श्री बोंडे, राजपुरोहित डी टी, राव आशिष भिरुड, वैशाली नेमाने, केतकी मेडिकोच निलेश पाटील, इएसआयसीचे हेमंत पाटील यंच्यासह लोकमत वृत्‍तपत्राचे महा व्यवस्थापक गौरव रस्तोगी, सुरज ढाये, अविनाश सावदेकर, सकाळ वृत्‍तपत्राचे खान्देश आवृत्‍तीचे ब्युरो चिफ सचिन जोशी, दिव्य मराठी वृत्‍तपत्राचे ईश्वर पाटील, चेतन महाजन, लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे आशुतोष हजारे, मार्केटिंग विभागातील रत्नशेखर जैन यांच्यासह पीआरओ आदिंनी उपस्थीत राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.

Protected Content