डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात केक कापून महिला दिन साजरा

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात केक कापून महिला दिन साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.उल्हास पाटील सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.पी.बावुसकर, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड.सतिश घाडगे यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी एल एल. बी तृतीय वर्षातील विद्यार्थी सुनील चौधरी याच्या बासरी वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यानंतर डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील यांच्यासह महाविद्यालयातील महिला स्टाफच्याहस्ते केक कापून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महिलांना समान वागणूक देवून, प्रत्येक महिलेचा सन्मान करावा अशी शपर्थ अ‍ॅड.शैलेश नागला यांनी उपस्थीत सर्व विद्यार्थ्यांना दिली. सर्व मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शनपर संबोधन/भाषण केले. कार्यक्रम यथोचित रित्या पार पाडण्यासाठी बी.ए.एल.एल.बी. प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली व त्यांना महाविद्यालयातील लायब्ररीयन मनीषा इंगळे यांनी सहकार्य केले.

 

Protected Content