जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी असलेल्या जागतिक शरीर रचना शास्त्र दिनानिमित्त शरीररचना शास्त्र विभागाने पोस्टर व रांगोळी मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती.
यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. शुभांगी घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यात व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पोस्टर व रांगोळी मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मानवी शरिरातील विविध अवयव, हाडे याशिवाय आतड्यांची रचना आदिंचे चित्र रेखाटले. परिक्षक म्हणून डॉ दिलीप ढेकळे, डॉ अनंत बेंडाळे, डॉ. कैलास वाघ यांनी काम पाहीले.
यावेळी वसंतदादा पवार वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ सुधीर भामरे, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय संभाजीनगर मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी भटाचार्य, संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, सदस्य डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील,वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ.एन.एस.आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,शरिररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ.अमृत महाजन,प्रा.डॉ.शुभांगी घुले,शल्यचिकीत्सा प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड, मेडीसिन डॉ.सी. डी सारंग,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. डॉ सुधिर भामरे, डॉ मिनाक्षी भटटाचार्य यांनी अनमोल मार्गदर्शन करीत उपक्रमाचे कौतुक केले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रिती सोळंके, डॉ.झमीर अहमद, डॉ.पूनम, डॉ.रघुराज यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख,टिचिंग-नॉन टिचिंग स्टाफ उपस्थीत होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार राजनंदीनी पाटील,अमीत पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी शरीररचना विभागाचे प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.