जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके व कार्यक्रम अधिकारी प्रा.एन.डी.पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर वत्कृत्व स्पर्धाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांनतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. आर. सपकाळे सरांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील अनुभव सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी डॉ.सागर चव्हाण, डॉ.ललीत जावळे, प्रा.संजय सपकाळे, कुणाल तेलंग, ऋषिकेश तळोले, नवल तराडे, गणेश तायडे, संदिप पाउलझगडे, पंकज मोरे, प्रा. अश्विनी मोलके, राणी थुटे, एस.आर.शेख व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कविता पवार यांनी तर आभार नंदकिशोर भदाणे यांनी मानले.