डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूलचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पिअनशिप २०२४-२५ राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच दि. २२ ते २६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान अग्रसेन मॉडर्न स्कूल दिल्ली येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल सावदा व एकलव्य धनुर्विद्या अकॅडेमी नांदगाव खंडेश्वर ची विद्याथींनी जिज्ञासा प्रशांत भारंबे हिने १७ वर्षे वयोगटात रिकर्व्ह प्रकारात ६० मिटर १st डिस्टन्स ब्रॉंझ मेडल, २nd डिस्टन्स गोल्ड मेडल व ओव्हरऑल प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. तिने २ गोल्ड व १ ब्रॉंझ असे एकूण तीन पदक प्राप्त केले आहे.

याआधी सुद्धा जिज्ञासा हिने राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त केले आहे. गुजरात येथे १० ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला भारतीय संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक अमर जाधव सर तसेच सिनियर खेळाडू निशांत राठोड व ओम कोळी यांचे मागर्दशन मिळाले. तसेच डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल चे संचालिका केतकी पाटील यांचे अनमोल सहकार्य मिळत असते. तिच्या या यशासाठी गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, मुख्याध्यपिका भारती महाजन, एकलव्य धनुर्विद्या अकॅडमी चे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. सदानंद जाधव सर यांनी तिचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

Protected Content