रावेर प्रतिनिधी । महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबियांसह तालुक्यातील विवरा येथे मतदान केले.
डॉ. उल्हास पाटील हे मूळचे रावेर तालुक्यातील विवरा येथील रहिवासी असून त्यांचे मतदानही येथेच आहे. या अनुषंगाने आज सकाळी त्यांनी येथील शाळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी त्यांच्यासोबत मातोश्री गोदावरी पाटील, सौभाग्यवती डॉ. वर्षा पाटील तसेच कन्या डॉ. केतकी हेदेखील उपस्थित होते. मतदान केल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देण्यास प्रारंभ केला आहे.