जळगाव प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलीत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. व बी.टेक. अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून यासाठी कॉलेजने खास हेल्पलाईनचे क्रमांक जाहीर केले आहेत.
गोदावरी फाऊंडेशन संचलीत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी.; बी.टेक. (अॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंग) आणि बी.टेक. (फुड टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक विद्यार्थी यासाठी २२ डिसेंबरपर्यंत प्रवेश घेऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी http://cetcell.mahacet.org ; https://info.mahacet.org/mahacet ; http://www.mcaer.org या संकेतस्थळांवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सुविधा मिळावी म्हणून महाविद्यालयार्फे प्रत्येक अभ्यासक्रमासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. यात-
१) बी.एस्सी. अॅग्री : प्रा. ए.बी. पासेकर, संपर्क क्रमांक -७३८७०४१९६५
२) बी.एस्सी. अॅग्री : प्रा. आर. डी. चौधरी, संपर्क क्रमांक -९४२०३८९६१२
३) बी. टेक. अॅग्री. इंजिनिअरिंग : प्रा. पी.ए. यादव, संपर्क क्रमांक -९४५००७०३६३
४) बी. टेक. अॅग्री. इंजिनिअरिंग : प्रा. एस. आर. सपकाळे, संपर्क क्रमांक -७५८८६८८०९५
५) बी. टेक. अॅग्री. इंजिनिअरिंग : प्रा. वाय. बी. सोनोने, संपर्क क्रमांक -७८७५४६९१०१
६) बी. टेक. फुड टेक्नॉलॉजी : प्रा. व्ही. बी. धांडे, संपर्क क्रमांक – ८९८३२६०५९६
७) बी. टेक. फुड टेक्नॉलॉजी : प्रा. व्ही. नाखडे, संपर्क क्रमांक – ८२०८७७५२१
या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.