Home Agri Trends पर्यावरण मित्र संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. सुरेश पाटील

पर्यावरण मित्र संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. सुरेश पाटील

0
44

एरंडोल प्रतिनिधी । येथील माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक डॉ.सुरेश कालेश्‍वर पाटील यांची पर्यावरण मित्र संघटना भारत च्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय मार्गदर्शक प्रा.दीपक भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक देवा तांबे यांनी दिले आहे. आपल्या विभागात केलेल्या पर्यावरणाच्या कार्याची दखल घेऊन तसेच पर्यावरण मित्र संघटना भारत अंतर्गत पर्यावरण मित्र या नात्याने पर्यावरणाचे रक्षणाचे निःस्वार्थी आणि प्रामाणिक कार्य आपल्या हातुन होईल अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात करण्यात आली आहे. डॉ.सुरेश पाटील यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound