डॉ.शामकांत भादलीकर यांची सिम्बॉयसिसच्या कुलसचिवपदी निवड

symbiosis college of nursing mulshi pune nursing institutes 315ji5a

जळगाव (प्रतिनिधी) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विधी व माहिती अधिकार विभागाचे प्रमुख डॉ. शामकांत राजाराम भादलीकर यांची पुणे येथील सिम्बॉयसिस स्कील अॅण्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या कुलसचिवपदी निवड करण्यात आली आहे.

 

डॉ. भादलीकर हे सध्या विद्यापीठाच्या विधी व माहिती अधिकार विभागात उपकुलसचिवपदी कार्यरत असून त्या विभागाचे प्रमुख आहेत.  डॉ. भादलीकर विद्यापीठात 1996 पासून कार्यरत असून त्यांनी विद्यापीठाशी संबंधीत अनेक न्यायालयीन प्रकरणात विद्यापीठाची बाजू समर्थपणे मांडून मोलाची कामगिरी केली आहे. डॉ. भादलीकर यांनी बी.एस.एल.,एल.एल.बी., एल.एल.एम. आणि पीएच.डी पदवी संपादित केली असून ते विद्यापीठाच्या ‘स्कुल ऑफ लॉ’ चे प्रमुखही आहेत.

सिम्बॉयसिस ही आंतरराष्ट्रीय स्तरावर किर्ती मिळविलेली शैक्षणिक संस्था असून एक दर्जेदार शैक्षणिक केंद्र म्हणूनही तिचा सर्वत्र लौकीक आहे. डॉ. भादलीकर यांची सिम्बॉयसिस येथे कुलसचिवपदी निवड झाल्याबद्दल विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शहरातील वकिल वर्ग आणि समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Add Comment

Protected Content