जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी घेण्यासाठी आलेल्या तरूणाच्या खिशातून ५५ हजार रूपयांची रोकड रिक्षातून लांबविली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रूपेश रमेश भाटीया (वय-३२) रा. भाटीया गल्ली धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आगरबत्ती विक्री व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. व्यवसाय करण्यासाठी त्याला जुनी दुचाकी घेण्यासाठी २८ मे रोजी जळगावात आला होता. त्यावेळी रूपेशने ५५ हजार रूपये सोबत आणलेले होते. जळगावात आल्यानंतर त्याचा मित्र मनोज वाणी याला भेटून गणेश कॉलनीतील ख्वॉजामियॉ येथे त्याला जुन्या दुचाकी पसंत पडल्या नाहीत. दोघेजण दुचाकीने आकाशवाणी चौकात आले. धरणगाव जाण्यासाठी रूपेश रिक्षात बसला. रिक्षामध्ये आधीच अनोळखी दोन पुरूष आणि एक महिला बसलेले होते. त्यात रूपेश चौथा बसला. त्यातील महिला ही शिवकॉलनी स्टॉपवर उतरली. त्यानंतर रूपेश मित्रांच्या सांगण्यावरून खोटेनगर येथे उतरला. त्यानंतर रूपेशचा मित्र खोटेनगर येथे दुचाकीवर आला. रूपेशने खिश्याला हात लावला असता खिश्यातील पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. दोघांनी धरणगावपर्यंत शोध घेतला परंतू कुठेही मिळून आले नही. कामात व्यस्त असल्याने त्त्यांनी पोलीसात तक्रार दिली नाही. दरम्यान, ९ जुलै रोजी त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षात चोरी करणाऱ्यांना पकडले ही बातमी वाचली. बातमीत दिलेले आरोपीचे फोटो पाहिल्यावर रूपेशच्या लक्षात आले की त्याच्या खिश्यातून रिक्षा चालक असल्याचे दिसून आले. रूपेशने सोमवारी ११ जुलै रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.