धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) येथील रहीवाशी डॉ.पराग पांडव यांना हैदाबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून नोकरी लागली आहे. त्यामुळे डॉ.पांडव यांनी त्यांच्याकडे असलेली युपीएससी/ एमपीएससीची तब्बल ११० पुस्तकं तसेच हस्तलिखित नोट्स डॉ.बी.आर.आंबेडकर मोफत अभ्यासिकेला भेट दिली आहेत.
यावेळी डॉ. पांडव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, मी जरी मोठ्या पदावर पोहचलो असलो,तरी माझ्या गावातील,परीसरातील तरुण-तरुणी यांनी या पुस्तकांचा लाभ घेतला पाहिजे. डॉ.बी.आर.आंबेडकर अभ्यासिकेत येऊन वापर करुन फुकटात नोकरीला लागले पाहीजे, अशी आशा देखील डॉ.पांडव यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी अभ्यासिकेचे मुळसंचालक प्रशांत सोनवणे, उपसंचालक अमोल महाजन, सुनिल कोळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ पांडव, पंकज पांडव आदी उपस्थित होते.
दरम्यान,डॉ.बी.आर.आंबेडकर अभ्यासिका २४ तास सुरु असते. अभ्यासिका पूर्णंत मोफत असून फक्त पहील्यांदाच १०० रुपये भरावे लागतात. अभ्यासिकेत सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके, नोट्स, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, दर रविवारी चर्चासत्र असते. तसेच अभ्यासिकेत येणाऱ्या तरुणांचे मोफत अॉनलाईन फॉर्म देखील भरले जातील.