जळगाव प्रतिनिधी । सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले खान्देशातील एकमेव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागाद्वारे १५ ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान मानसोपचार निदान, उपचार, समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान मानसोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात फिट्स मिर्गी, निद्रानाश, स्मृतीभ्रंश, लैगिंक समस्या, लहान मुलांचे मानसिक विकार अशा विविध समस्यांचे अचूक निदान करुन उपचार केले जातात. तसेच केवळ १०० रुपयात महिनाभराची औषधी दिली जाते. याशिवाय तज्ञ डॉक्टरांची टिमही येथे सेवा देत असून त्यात रांची येथून शिक्षण घेतलेले डॉ.विलास चव्हाण, पुणे येथून शिक्षण घेत आठ वर्षाचा अनुभव असलेल्या डॉ.साची बंग याशिवाय समुपदेशनसाठी बबन ठाकरे यांचा समावेश आहे. तरी रुग्णांनी आपल्या समस्यांचे निराकरण करुन योग्य वेळेत उपचार घ्यावे असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनने केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ.गाविंद यादव ८४५९८४८९४८, डॉ.मुजाहिद शेख ७५८८४२४३९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.