भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी डॉ. नि. तु. पाटील यांची वैद्यकीय आघाडीमध्ये दोन महत्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली असून याबाबत आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
डॉ. नि. तु. पाटील यांनी भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र जळगाव सहसंयोजकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे आणि संयोजक बाळासाहेब हरपळे यांनी अधिकृत घोषणा केली आहे.
दरम्यान, यासोबत भाजप वैद्यकीय आघाडीमध्ये भुसावळ विधानसभा क्षेत्र संयोजकपदी देखील डॉ. नि. तु. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत देखील आजच अधिकृत घोषणा झालेली आहे. यामुळे एकचदा दोन महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.