डॉ. नि.तु. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेसाठी “मोफत ऑक्सिजन सिलेंडर”

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील प्रख्यात समाजसेवक व आरोग्यदुत डॉ. नि.तु. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने देवा गृप फाऊंडेशन फुलगाव मार्फत सुरु केलेल्या रुग्णवाहिकेसाठी “मोफत ऑक्सिजन सिलेंडर” उपलब्ध करुन दिले. 

दरम्यान, वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व जपलं त्या साठी मार्गदर्शक राजेंद्र चौधरी यांनी फोन करुन डॉ. नि.तु.पाटील यांना देवा गृपसाठी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी केली व या शब्दाला मान देऊन डॉ.नि.तु.पाटील यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली व आज वाढदिवसाचे औचित्य साधुन ऑक्सिजन सिलेंडर देवा ग्रुप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना सुपूर्द केले.

देवा ग्रुप फाउंडेशन फुलगाव राजेंद्र चौधरी आणि डॉ.नि.तु.पाटील यांचे मनःपुर्वक आभारी मानले. यावेळी उपस्थित डॉ.नितु पाटील, मयुर चौधरी, मिलिंद महाजन, विशाल चौधरी, सागर सोनवणे, युवराज आलोकार  इतर कार्यक्रत्ये उपस्थित होते.

 

Protected Content