यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा १९८५ साली बसविण्यात आला होता. परंतू आता पुतळा जीर्ण अवस्थेत आहे. यामुळे ग्रामपंचायत स्तरावर लवकरात लवकर याची दखल घेवून त्या ठिकाणी नवीन पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने जिल्हा परिषदच्या सदस्या सविता भालेराव यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
दरम्यान भीम आर्मीने दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे की मोहराळा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा जिर्ण अवस्थेत असुन सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता येत्या एक महिन्यात आपण स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दखल घ्यावी व त्वरीत पुतळा दुरुस्तीचे कार्य करावे अन्यथा भिम आर्मी भारत एकता मिशन जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिटच्या माध्यमातून मागणीनुसार निर्णय झाला नाही तर भीम आर्मीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग व जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या पर्यंत आमच्या भावनांचे आदर करून मागणीचे निवेदन वरिष्ठापर्यंत पाठवून सदरील मागणीची पूर्तता करावी असे निवेदनात भीम आमीचे यावल तालुका गौरव सोनवणे यांनी म्हटले आहे. सदरच्या मागणी निवेदन देतांना भीम आर्मीचे प्रदेश सचिव सुपडु संदाशिव, यावलतालुका अध्यक्ष हेमराज तायडे, सचिन वानखेडे, गोविंदा सोनणने, सतिष अडकमोल, जय वानखेडे, कपिल अडकमोल, काशिनाथ अडकमोल, राहुल जयकर , पंकज डांबरे ,निखिल जोगी आदींच्या प्रामुख्याने उपस्थित होते.