यावल-,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज । नेपाळ या देशात भाविकांच्या लक्झरी बसचा भिषण अपघात होवुन यात २५ भाविकांचा दुदैवी मृत्यु झाला असुन,यावल येथील भाजपाचे युवा नेते डॉ कुंदन फेगडे यांनी अपघातात मृत्यु पावलेल्या कुटुंबाचे सांत्वन केले.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ,वरणगाव व तळवेल या ठीकाणचे भाविकांना दर्शनासाठी घेवुन जाणारील लक्झरी बस ही नेपाल देशातील काठमांडू व पोखरा शहराच्या दरम्यान असलेल्या आईना पर्वताच्या खाईत कोसळुन झालेल्या अत्यंत भिषण अपघातात २५भाविकांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना घडली असुन, या भिषण अपघातात अनेकांचे संपुर्ण परिवारच समाप्त झाले.
दरम्यान, भुसावळ,वरणगाव व तळवेल या ठिकाणी जावुनअत्यंत भिषण व दुदैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुंटूबांची भेट घेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व युवा समाजसेवक डॉ कुंदन फेगडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या दुखाच्या सागरात बुडालेल्या कुटुंबाला या वेदना पेलण्याचे सामर्थ्य देवो अशी प्रार्थना केली .