Home Cities यावल डॉ. कुंदन फेगडे यांच्या ‘विजय संकल्प’ अभियानास उस्फूर्त प्रतिसाद

डॉ. कुंदन फेगडे यांच्या ‘विजय संकल्प’ अभियानास उस्फूर्त प्रतिसाद

0
38

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा आश्रय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे यांनी सुरू केलेल्या विजय संकल्प-२०२४ या अभियानास मतदार संघातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.

येथील भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकिय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस व आश्रय फाउंडेशन या समाज सेवेत अग्रेसर असलेल्या समाजसेवी संघटनेचे अध्यक्ष तथा युवा नेते डॉ कुंदन फेगडे यांनी आपला विजय संकल्य२०२४हे अभियान सुरू केले असुन,त्यांच्या या जनसामान्यांशी संपर्क साधण्याच्या अभियानास रावेर विधानसभा क्षेत्रातील सर्व स्तरावरून विजय संकल्पातुन जनसामान्याशी संपर्क या अभियानास मोठा पाठींबा मिळत आहे.

डॉ. कुंदन फेगडे यांनी यावल तालुक्यातील हंबर्डी येथील सरपंच सौ उषाताई चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासी भेट देवुन आपल्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधुन त्यांच्याकडून गावपातळी वरील समस्यांची माहिती जाणुन घेतली.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे चिटणीस व माजी सरपंच किशोर पाटील, भाजपाचे हंबर्डी शाखा अध्यक्ष विजय बाविस्कर ,जितेन्द्र फालक ,सुपडू नेहते ,भरत नेमाडे ,प्रसन्न पाटील ,जयंत किरंगे, निशांत पाटील ,मोहीत किरंगे, लोकेश किरंगे आदि कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते .


Protected Content

Play sound