यावल-लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | विवरे ते वडगाव रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्तांना डॉ. कुंदन फेगडे यांनी मदतीचा हात दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
अंकलेश्वर बर्हाणुपर राज्य मार्गावर सावदा कडून बर्हाणपूर कडे जात असतांना प्रवासी वाहतूक करणारी ऍपेरिक्षा रस्त्यावर उलटली. हा अपघात शनिवार दुपारी विवरे ते वडगाव रस्त्यावर झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून महिले सोबत एक दोन वर्षीय बाळ व एक ७ वर्षीय मुलगी होती. अपघातानंतर याच मार्गावरून यावल येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे हे जात होते. त्यांनी वाहन थांबून आपल्या स्वतःच्या वाहनांमध्ये जखमींना बसवले आणि रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून स्वतःच त्यांच्यावर उपचार देखील केले व माणुसकीचे दर्शन घडवत जखमी महिलेचे प्राण वाचवले. यावेळी अपघाता नंतर ऍपेरिक्षा चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता.
अंकलेश्वर – बर्हाणपूर राज्य मार्गावर सावदा येथून प्रवासी घेऊन एक अज्ञात ऍपेरिक्षा चालक ऍपेरिक्षा क्रमांक एम. एच. १९ बी. जे. ५२८५ घेऊन बर्हाणपूर कडे जात होता. दरम्यान वडगाव ते विवरे या रस्त्यावर रिक्षा अनियंत्रित झाली व रस्त्यावर कलंडली या अपघातामध्ये दिपाली पांडव रा. बर्हाणपूर ही महिला गंभीर जखमी झाली व इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, डॉ. कुंदन फेगडे हे जात होते त्यांनी स्वतःचे वाहन थांबवले यांनी जखमींना त्यांच्या वाहनात बसवले व तेथून रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले तिथे स्वतःच्या हातूनच त्यांनी काही रुग्णांवर उपचार देखील केले आणि माणुसकीचे दर्शन घडवले असून यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.