डॉ. केतकी पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी; भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी आज मुंबईत भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. केतकी पाटील यांची निवडीची घोषणा करण्यात येवून निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी आपली कन्या तथा गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे बुधवारी २३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्यासह आदी उपस्थित होते. पक्ष प्रवेश झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. केतकी पाटील यांची महाराष्ट्र राज्य भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली व निवडीचे नियुक्तीपत्रही देण्यात आले.

Protected Content