खामगाव प्रतिनिधी । गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात व मिशन ओ टू उपक्रम अंतर्गत वृक्ष लागवडीचा व संगोपन चा संकल्प घेत सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल व जनजागृती करत असल्याबद्दल खामगाव येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. कालिदास थानवी व डॉ. गायत्री थानवी यांचा सत्कार करण्यात आला आहे.
शेगाव येथे इलेक्ट्रॉनिक प्रिंट व वेब न्यूज मीडियाच्या वतीने चला निवडणुकीला सामोरे जाऊ या व्यासपीठाद्वारे सर्वपक्षीय जनप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी यांच्यात एका मंचावर जुगलबंदीचे आयोजन व प्रेक्षकातून स्थानिक नागरिकांच्या वतीने थेट रोखठोक प्रश्नांचा भडिमार असा अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणून लाभलेले ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे ,अनिल गवई ,मयूर निकम यंच्या उपस्थितीत हा गौरव सत्कार सोहळा पार पडला.हा कार्यक्रम यशस्वी करण्या करता पत्रकार महेंद्र मिश्रा, अमोल सराफ ,नानाराव पाटील ,समीर देशमुख रोहित देशमुख सह मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.