अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मारवड परिसर विकास मंच व मिल के चलो असोसिएशन वावडे, यांच्या संयुक्त प्रकल्प आणि मारवडचे आदरणीय आयुक्त संदीपकुमार साळुंखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारी व इस्रोचे चेरमन डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते उद्घाटन झालेली डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा ही उद्या अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय शैक्षणिक संस्थेत दिनांक 10 जानेवारी रोजी हजेरी लावणार असून दुपारी साडे बारा वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत थांबणार आहे.
या दरम्यान शाळेतील इ. ६ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध प्रयोगाचे मॉडेल दाखवून मार्गदर्शन करणार आहेत. शक्य झाले तर ओळखीत असलेल्या मुलांना ही माहिती कळवावी, तसेच परिसरात असलेल्या शालांत विद्यार्थ्यांनी देखील या संधीचा फायदा घ्यावा व माहिती करून घ्यावी असे आवाहन डॉ कलाम फिरती प्रयोगशाळाचे समन्वयक विनायक पाटील, चेतन वैराळे, अनिल पाटील व चालक दिनेश कोळी यांनी केले आहे.