यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विविध समाज हिताचे सामाजीक उपक्रम राबवत रावेर आणि यावल तालुक्यात आपल्या आश्रय फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या व कांताई या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आपण अनेक आरोग्य संदर्भातील शिबिर आयोजीत करून सुमारे १० हजार रूग्णाच्या डोळयांच्या मोतीबिंदूंची मोफत तपासणी करण्यात आली व यातील सुमारे एक हजार रूग्णांच्या डोळयांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यात याच बरोबर सुक्षशित बेरोजगारांसाठी ऑनलाईन नोकरी मिळुन देण्यासाठी मेळाव्या आयोजीत करीत सुमारे ९०० तरूण बरोजगारांना नोकरीस लावण्यात यश मिळवल्याची माहिती तालुक्यातील फैजपुर येथील शुभ दिव्य या सभागृहात आश्रय फाउंडेशन रावेर-यावल या सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेच्या माध्यमातुन अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे यांनी दिली यावेळी त्यांनी संस्थेच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
डॉ कुंदन फेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय डॉक्टर दिना निमित्ताने कौटुंबीक स्नेहमेळावा उत्साहाच्या वातावरणात पार पाडला. यावेळी डॉ उमेश चौधरी , डॉ गणेश भारंबे, डॉ सुनिल चौधरी,डॉ. व्ही.जे वारके, डॉ प्रमोद पाटील , डॉ दत्त प्रसाद दलाल,डॉ संगिता महाजन , रावेर आणी यावल या परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवरांची सहकुटुंब या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते . स्नेहमेळाव्यात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केलीत. या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्तच्या आयोजीत स्नेह मेळाव्यास यशस्वी करण्यासाठी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे उपाध्यक्ष डॉ विलास चौधरी , सचिव डॉ पराग पाटील, खजिनदार डॉ राजेश चौधरी , सदस्य डॉ भरत महाजन, डॉ शैलेश खाचणे, डॉ नितिन महाजन, डॉ ललीत बोरोले , डॉ प्रशांत जावळे, डॉ ताराचंद साळवे , डॉ आशिष सरोदे , डॉ चेतन कोळंबे, डॉ योगेश पाटील , डॉ गौरव धांडे , डॉ दिलीप भाटकर, डॉ प्रफुल पाटील , डॉ प्रसाद पाटील, डॉ निलेश पाटील ,डॉ अभिजित सरोदे, डॉ प्रशांत भारंबे आदीनी महत्वाचे परिश्रम घेतले .