एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते डॉ. हर्षल माने यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
एरंडोल येथे दि २६ ऑक्टोबर रोजी डॉ हर्षल माने यांच्या ४८ व्या वाढदिवसा निमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गरजू सुशिक्षित बेरोजगारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ माने यांच्या कडून करण्यात आले आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना आपण समाज्याचे काही तरी देने लागतो म्हणून मी माझ्या सर्व शिवसेना पदाधिकारी (उ.बा. ठाकरे) यांच्या सहकार्याने तसेच विशेष सहकार्य आमचे मित्र समाजसेवक तसेच आरोग्य सेवक रोशन मराठे (लक्ष्य फाउंडेशन) यांच्या सहकार्याने ह्या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून त्यात मुंबई, पुणे, नासिक, संभाजीनगर व जळगाव सारख्या मोठ्या शहरात उपलब्ध असलेल्या नामांकित मल्टी नॅशनल कंपन्यांत रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. या भव्य रोजगार मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता किमन आठवी, दहावी, बारावी तसेच पदवी उत्तीर्ण अशी आहे. यासोबत सर्व ट्रेडचे आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रीकी पदवीधर शैक्षणिक पात्रता धारक युवक- युवर्तीसाठी याचे आयोजन करण्यात आले असून नियुक्ती झालेल्या युवक-युवती यांना जागेवरच नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.
दरम्यान, तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू युवक-युवती यांनी या भव्य अश्या रोजगार मेळाव्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांना आव्हान करण्यात येत आहे. सदर मेळावा दि २६ रोजी एरंडोल येथीलकमल लॉन्स, धरणगाव रोड येथे सकाळी १० ते ५ या वेळे दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.