डॉ. उल्हास पाटील यांच्या दिर्घायुष्यासाठी गायत्री यज्ञ; महामृत्यूंजय जाप !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या ६५ व्या वाढदिवसांनिमीत्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंत्रोच्चारात गायत्री यज्ञ करण्यात आला. तसेच त्यांच्या दिर्घायुष्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये महामृत्युंजयाचा जापही करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे सर्वेसर्वा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचा ६५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वैद्यकीय महाविद्यालयात गायत्री याग
वैद्यकीय महाविद्यालयात रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, सौ. ज्योत्सना भिरूड, राजपुरोहीत डी.टी. राव, गोपाळ भोळे, सौ. भोळे यांच्या हस्ते गायत्री यज्ञ करण्यात आला. तसेच यावेळी डॉ. उल्हास पाटील यांचा ६५ व्या वाढदिवसानिमीत्त शुध्द तुपाचे ६५ दीपप्रज्वलन करून महाआरती करण्यात आली. यावेळी हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व रूग्णालयातील स्टाफ उपस्थित होते.

शैक्षणिक संस्थांमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जाप
डॉ. उल्हास पाटील हे वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन दिर्घायुष्य लाभावे यासाठी गोदावरी फाउंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जाप करण्यात आला. तसेच गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय यासह गोदावरी आयएमआर महाविद्यालयात डायरेक्टर डॉ. प्रशांत वारके व प्रा. सौ. निलीमा वारके यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य,रजीस्ट्रार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Protected Content