दिपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागॄह बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक न्याय विभागांतर्गत 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून याचे समाजबांधवांनी स्वागत केले आहे.
भुसालळ तालुक्यातील फेकरी गावामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून आणि वेळोवेळी शासन दरबारी केलेल्या पाठपुरवठ्याच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागॄह बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक न्याय विभागांतर्गत 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून याचे समाजबांधवांनी स्वागत केले आहे.
यावेळी फेकरी गावच्या सरपंच चेतनाताई संजय भिरूड, भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघाचे उपसभापती प्रशांत सुखदेवराव निकम,भारतीय जनता पाटचे सर्व पदाधिकारी आणि समस्त गावकऱ्यांनी आमदार संजय सावकारे यांचे आभार व्यक्त केलेत.
फेकरीतील डॉ. आंबेडकर सभागृहासाठी 50 लाखांचा निधी
4 months ago
No Comments