चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला चोपडा विधानसभेची जागा न सुटल्याने गेल्या तीन पंचवार्षिक पासून सातत्याने आमदारकीसाठी नशीब आजमावणारे डॉ. चंद्रकांत बारेला यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता. मात्र दि. ४ नोव्हेंबर रोजी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान कार्यकर्त्यांसोबत जाऊन माघार घेणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.
त्यांनी सांगितले की, पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, राज्याध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित दादा पवार यांनी भ्रमणध्वनीवरून माझ्याशी संपर्क साधला व त्यांनी माघार घेण्यासाठी सांगितले असल्याने त्यांच्या विनंतीला मी मान देऊन माझा उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याचे कळविलेले आहे.