जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे दि. ६ ते ९ ऑक्टोंबर मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून आजपासून शिबिरास प्रारंभ झाला.
यात पहिल्याच दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. येत्या ८ ऑक्टोंबरपर्यंत रुग्णांची नावनोंदणी केली जाणार असून ९ ऑक्टोंबरपासून शस्त्रक्रियांना सुरुवात होईल. शिबिरात एमडी मेडिसीन व एमसीएच तज्ञांकडून तपासणी केली जात असून शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे गरजु रूग्णांसाठी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील यांच्या ९ ऑक्टोबर या वाढदिवसानिमित्त ६ ते ९ ऑक्टोंबर हे चार दिवस मोफत तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्याला आजपासून सुरुवात झाली. यावेळी रुग्णांनी सकाळपासून रुग्णालयात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी रुग्णालय प्रशासनाने कोविड नियमांचे पालन करा, अशा सुचना केल्या व सोशल डिस्ट्न्ससिंग पाळले जावे यासाठीही उपाययोजना केल्यात. रुग्णांच्या नोंदणीस सकाळपासून प्रारंभ झाला असून यात पहिल्याच दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. डॉ.वर्षा पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने हे शिबिर घेतले जात असून ८ ऑक्टोंबरपर्यंत रुग्णांची नोंदणी केली जाणार असून ९ ऑक्टोंबरपासून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तरी रुग्णांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.उल्हास पाटील रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
८ ऑक्टोंबर पर्यंत होणार नोंदणी
या महाशिबीरात मुतखडा, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहे. तसेच जनरल मेडीसीन महाआरोग्य शिबीरात किडनीचे आजार, ब्रेन हॅमरेज, मेंदूज्वर, फुफ्फुसाचे आजार, न्युमोनिया, दमा, क्षयरोग, विषबाधा, लिव्हर, मलेरीया, मोफत डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मेडीसीन शिबीरात ब्रेम हॅमरेजशी संबंधीत उपचारासाठी रूग्णालयात भरती झालेल्या रूग्णांची एमआरआय तपासणी सवलतीत केली जात आहे. या महाशिबीरात एमसीएच तज्ञ डॉक्टरांकडुन रूग्णांची तपासणी देखील मोफत केली जात आहे. हे शिबीर येत्या ८ आक्टोंबर पर्यंतच राहणार असून शस्त्रक्रिया ९ ऑक्टोबरपासून सुरु होतील. महाशिबीरासाठी विभागनिहाय स्वतंत्र टिम कार्यरत करण्यात आल्या आहेत. रूग्णांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली असुन त्यामुळे शिबीराचा लाभ घेण्यासाठी गरजु रूग्णांनी त्वरीत आशिष भिरूड ९३७३३५०००९ आणि रत्नशेखर जैन ७०३०५७११११ या क्रमांकावर संपर्क साधुन आजच नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.