पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत आज दिनांक 14/4/2024 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील उपशिक्षक जयंत शेळके हे होते.उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वेळी 18 विद्यार्थ्यांनी तसेच श्रीमती जयश्री पाटील,श्रीमती छाया पारधे, निर्मला महाजन, रामेश्वर आहेर, मुख्याध्यापक पी.टी.पाटील, पालक नाना सुरळकर, जयंत शेळके यांनी भाषणे केली.
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. सामान्यज्ञान स्पर्धेत एकूण 132 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना धनगर यांनी केले व आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.