सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील सावदा येथील येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक यांची सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. यावर्षी उत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धांत संन्यास यांची अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी बंटी लोखंडे व अविनाश संन्यास यांची निवड करण्यात आलेली आहे.
सचिव पदी प्रकाश तायडे, सहसचिवपदी मनोज भालेराव, खजिनदारपदी कुणाल लोखंडे, कोषाध्यक्षपदी विशाल इंगळे, सल्लागरपदी लखन सोनवणे तर पवन लोखंडे, रोहित संन्यास, सिद्धांत लोखंडे, विवेक डोळे, सारंग तायडे, दीपक तायडे या सर्वांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाली आहे. या वर्षांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.