जळगाव प्रतिनिधी । संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून सायंकाळी मिरवणुका काढण्यात आल्या. यात हजारो आबालवृध्द सहभागी झाले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सायंकाळी शहरातून मिरवणुका काढण्यात आल्या. यातील प्रत्येक मिरवणुकीमध्ये विविध देखावे करण्यात आलेले होते. यात भारताची संसद, संविधान, चैत्यभूमीची प्रतिकृती, गौतम बुद्ध, संविधान हातात घेतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी देखावे साकारण्यात आले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास सार्वजनिक मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील ३५ ते ४० मंडळे त्यात सहभागी झाले होते. डीजे, लेझीम, ढोल-ताशे तसेच विविध वाद्यांच्या तालावर तरुणाई थिरकत होती. शहरातील सर्व भागांमधील मित्रमंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. रात्री साधारणपणे साडेबारापर्यंत मिरवणुका चालल्या. ठिकठिकाणी या मिरवणुकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात विविध गाण्यांवर आबालवृध्द थिरकतांना दिसून आले.