कोचूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथून जवळच असलेल्या कोचूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

पळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. तर गावातील सिद्धार्थ मित्र मंडळ यांच्याकडून डॉ. आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. संजीवनी ब्लड बँक फैजपुर यांचेकडून २५ बॅगा रक्त संकलन करण्यात आले. रोहिणी खडसे खेवलकर यांनी देखील रक्तदान शिबिराला भेट दिली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे कोचुर खुर्द बोरखेडे सिम ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच रेशमी तायडे, कोचुर बुद्रुक चे सरपंच भगवान आढाळे, प्रगतिशील शेतकरी उज्वल पाटील, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील, प्रशांत तायडे, गणेश महाजन, किशोर पाटील, रोहित तायडे, अमर तायडे,पंकज तायडे, रोशन तायडे, अमोल मेघे, अजय कोसे, ईश्वर सुरवाडे, सुरज वानखेडे, अमोल तायडे, रोहन तायडे, आकाश तायडे आदी उपस्थित होते.

Protected Content