Home राजकीय डॉ.अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

डॉ.अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


 

मुंबई (वृत्तसेवा) राजा शिवछत्रपती मालिकेत राजे शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी मालिकेत संभाजीराजेंची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार आहे.

 

naklw 201903202198

मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. मात्र, शिवसेनेकडून त्यांच्या प्रवेशाचे वृत्त फेटाळण्यात आले होते. मात्र, आज मुंबईत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे. तसेच यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉ हर्षल यशवंत पवार, वरपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound