जळगाव, प्रतिनिधी | कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगावच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद जळगाव प्रशासकीय इमारत येथे जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा परिषदेत महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सुरळकर, बालविकास प्रकल्प अधिकारी आर. आर. तडवी कार्यकारी अभियंता एस. बी. नरवाडे, कृषी विकास अधिकारी एम. ऐ. चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे, उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पोटोळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कास्ट्राईब जि.प कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. टी. सोनवणे ,उपाध्यक्ष जितेन्द्र जावळे, चंद्रकांत चौधरी, मंगेश बाविस्कर, शकील देशपांडे, किरण लाडवंजारी, आर. एम. कांबळे, जितेंद्र बारी, किशोर वानखेडे, दीपक पाटील, रवीकिरण बि-हाडे, नूतन तासखेडकर, सुनंदा बैसाणे, ज्योती मोरे, एस. एन. बाविस्कर, पी. बी. मेढे, माधुरी बेहरे, संगीता सपकाळे, रत्ना तायडे इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र जावळे यांनी केले.