Home Cities जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस प्रारंभ

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस प्रारंभ

0
24

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस आज सकाळी प्रारंभ झाला असून यात महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गत अनेक महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक झाली नसल्यामुळे नाराजी होती. विरोधकांनी यावरून टीकादेखील केली होती. आता कोणत्याही क्षणाला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आज नियोजन भवनामध्ये डीपीडीसीची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील हे आहेत. तर बैठकीला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नियोजन समिती सदस्य उपस्थित आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound