साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । पहिल्याच पावसासोबतच्या वार्याने येथील डीपी जळून खाक झाल्याने वीज गुल झाली असून ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, पावसाळ्यात अनेक ठिकाणी तारा तुटणे, डीपीवरील फ्युज उडणे आदी बाबी होत असतात. तथापि, आज पहाटे झालेल्या पाऊसयुक्त वार्याने येथील डीपीमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन ती जळून खाक झाली. यामुळे गावातील काही भागातला वीज पुरवठा खंडीत झाला असून ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.