चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चुंचाळे येथील दि.३ रोजी नूतन परिवाराचे सेवा निवृत्त शिक्षक अजबराव पाटील (चहार्डी कर) यांनी आपल्या सेवानिवृत्ती निमित्ताने शिक्षकीसेवेची कर्मभूमी असलेल्या नूतन माध्यमिक विद्यालयास दूरदर्शन संच भेट देण्यात आले आहे.
यावेळी आपले परिवारासह शाळेला भेट देऊन गेले व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळेला दूरदर्शन संच त्यांनी भेट दिला. ही भेट प्राचार्य आर.ए सोनवणे यांनी स्वीकारून पाटील सरांचे आणि परीवाराचे नूतन परिवारा तर्फे आभार मानले.