रावेर प्रतिनिधी । तालुक्यांमध्ये केलेले विकास कामे खासदार व आमदारांनी जनते पर्यंत पोहचवून विरोधकांना बोलण्याची संधी देऊ नका अशा सूचना आज माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या आगामी भुसावळ दौर्याच्या नियोजनासाठी येथील बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत भाजपाफचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आगामी २१ तारखेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आज येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा चांगलाच समाचार घेत मोदी सरकारच्या कामांचा गुणगौरव केला तर लोकसभेची जागा भाजपाच्याच ताब्यात असुन शिवसेनेला रावेरची जागा मिळणार नसल्याचे संकेत देऊन निवडणुकीच्या कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी बैठकीला खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परीषद सदस्या सौ नंदाताई पाटील, रंजनाताई पाटील, कैलास सरोदे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके,प स सदस्या जुम्मा तडवी,पी के महाजन, सौ कविता कोळी,भाजपा जिल्हा सरचिटणीस सनिल नेवे,तालुकाध्यक्ष सुनील सुनिल पाटील, हर्षल पाटील ,माजी उपासभापती महेश चौधरी,सरचिटणीस महेश चौधरी पद्माकर महाजन, संदीप सावळे, श्रीकांत महाजन, यांच्या सह मोठ्या संखने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.