लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका ; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

ठाणे (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. एवढेच नव्हे तर, गरज असेल तरच घरा बाहेर पडा, अशी सूचक शब्दात आंदोलनाची दिशा कशी असेल याबाबत सूचित केले होते. परंतु लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका, असा आदेश राज ठाकरेंनी दिल्यानंतर जाधव यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीची नोटीस देण्यात आली आहे. मात्र या नोटीसनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राज ठाकरे यांना 22 तारखेला चौकशीसाठी बोलावले तर ठाणे बंद करु, असे मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जाहीर केले होते. तसेच प्रेमाने बंद केले तर स्वागत नाहीतर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता. राज्यात त्यादिवशी जे घडेल, त्याला सरकार आणि जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

 

परंतू मनसे अध्यक्ष राज यांनी लोकांना त्रास होईल असे काही करू नका, असे सांगितल्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाठी घेत आहोत. त्यांना चौकशीची नोटीस पाठविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि त्या तीव्र भावनेने आम्ही सरकार विरोधी ठाणे बंदचा इशारा दिला होता. पण त्या दिवशी आम्ही काय करणार आहोत. याचा निर्णय मात्र आदल्या दिवशी घेतला जाईल. आज मात्र आम्ही बंद पाठी घेत आहोत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.

Protected Content