एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पोलीस प्रशासनातर्फे विविध सूचना देण्यात आल्या.
एरंडोल येथे पोलीस स्टेशनतर्फे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी शांतता समिती गणेश मंडळाचे पदाधिकारी मान्यवर पोलीस पाटील व नागरिक यांची बैठक घेण्यात आली. गणेश उत्सव सर्वांनी शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.
गणेश उत्सव काळात कोणकोणत्या सूचनांचे पालन करावे. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गणेश मंडळांनी आरास उभारताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. याबाबत दक्षता पाळावी असे सूचित करण्यात आले. यावर्षीही गणेश उत्सव काळात डी.जे वर यावर्षी बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी गणेश उत्सव साजरा करण्यासंदर्भात विविध सूचनांची सविस्तर माहिती देऊन सर्वांनी गणेश उत्सव शांततेत साजरा करावा. असे आवाहन केले ऑनलाईन परवानगीबाबत सिटीझन पोर्टलवर माहिती अपलोड करण्याबाबतची माहिती गोपनीय पोलीस कर्मचारी मिलिंद कुमावत यांनी यावेळी दिली.
कार्यकर्माचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन व रवींद्र महाजन, रमेश महाजन, जगदीश ठाकुर, डॉ. नरेंद्र पाटील, जेरुद्दीन शेख कासम, किशोर निंबाळकर, शालिग्राम गायकवाड, असलम पिंजारी, डॉ. सुधीर काबरा, आरिफ मिस्त्री, शालिनी कोठावदे, जयश्री पाटील, आरती ठाकूर, शोभा साळी, डॉ. राखी काबरा, बी. एस. चौधरी, प्रा. नितीन पाटील, कैलास महाजन, पंकज महाजन, रतिलाल पाटील, राजधर महाजन, कुंदन ठाकूर आदी उपस्थित होते. अनिल पाटील, मिलिंद कुमावत, अखिल मुजावर, जुबेर खाटीक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी आभार प्रदर्शन केले.