स्व. कांतीजी कोळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अन्नदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या शाखा महाराष्ट्र प्रदेश जळगाव जिल्हा शाखेतर्फे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी आ. स्व. कांतीजी किसन कोळी (ठाणे) यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.

 

माजी आ. स्व.कांतीजी किसन कोळी यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त  शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी  पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परेश कोळी यांच्या आदेशाने, राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेव शहाबाजकर, प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ कोळी यांच्या सूचनेनुसार, प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रविणकुमार बाविस्कर, खान्देश विभागीय अध्यक्ष भिकन नंन्नवरे,  जिल्हा युवक अध्यक्ष धनराज साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वतीतेसाठी प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे, युवक जिल्हाध्यक्ष धनराज साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष सुकदेव रायसिंग, योगेश बाविस्कर, हर्षलभाऊ कोळी आदी  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Protected Content