मुंबई प्रतिनिधी । अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड असणारा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगल देशात अटक केली असून त्याला लवकरच भारतात आणले जाणार आहे.
रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो ऑस्ट्रेलियात राहात असावा असा सुरुवातीला पोलिसांचा अंदाज होता. मात्र तो पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल या देशात वास्तव्यास असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना लागली होती. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. भारतीय गुप्तचर यंत्ररणांनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक पोलिसांनी त्याला २२ जानेवारीला अटक केली असून याबाबत भारतीय दूतावासाला अटकेबाबतची कळविण्यात आले आहे. पुजारी याला लवकरच भारतात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.