बोंबला ! : पुन्हा महाग झाले सिलेंडर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इंधन आणि गॅसमुळे महागाई कडाडली असतांनाच आज गॅस सिलेंडर पुन्हा एकदा ५० रूपयांनी महागले आहे.

देशात सध्या महागाईने कळस गाठल्याचे दिसून येत आहे. यात प्रत्येक घराचा अविभाज्य घटक असणार्‍या घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे.

अलीकडेच याआधी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १०२ रुपयांनी वाढल्या होत्या. एप्रिल महिन्यात या किंमतीमध्ये २६८ रुपयांनी वाढ झाली होती. त्यात पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला त्यात वाढ झाली होती. एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या असताना आता घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Protected Content