Home Uncategorized भुसावळात डॉ. उल्हास पाटील यांची प्रचार रॅली

भुसावळात डॉ. उल्हास पाटील यांची प्रचार रॅली


भुसावळ (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी आज (दि.१०) येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली अष्टभुजा मंदीर येथे प्रचार नारळ वाढवून ढोल ताशांच्या गजारात काढण्यात आली.

या रॅलीत जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, जगन सोनवणे, जिल्हा अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष मो मुनंव्वर खान, राष्ट्रवादीचे उमेश नेमाडे, नाना पाटील, मयुरी पाटील ,योगेन्द्रसिंग पाटील, शहर अध्यक्ष रवींन्द्र निकम, अनिता खरारे, जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना पाटील, युथ काँग्रेसचे ईम्रान खान, समद शेख, राजु पटेल, रधु शेठ, रहीम कुरेशी, ईस्माईल गवळी, मेहबुब खान, सलिम गवळी, अकील शाह, संजय खडसे, भगवान मेडे, प्रा. सन्यांनशीव, कल्पना तायडे, रशीदा मॅडम, शैलेन्द नन्नवरे, जानी गवळी, बब्बु माळी, विवेक नरवाडे, लता हिरे, फिरोज खान, अहेमद कुरेशी, इम्रान शे. पापा, संतोष साडवे, विलास खरात यांच्यासह अनेक महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ही रॅली शनी मंदीर, पंचशील नगर जाम मोहल्ला, नसरवांजी फाईल, शिवाजी नगर, आगाखान बाडा, मिलत नगर, गोपाल नगर, ग्रिन पार्क, पापा नगर, पाटील मळा येथून जावून कार्यालयाजवळ संपन्न झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound