जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात मार्च महिन्यात उष्णतेची तीव्र लाट आली आहे शिवाय सणोत्सवाच्या काळात विज पुरवठा खंडीत करू नये, अश्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिलच्या सुरुवातीपासून मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान काळ सुरू झाला आहे. बहुतांश नागरिकांचे रोजे असल्याने ते उकड्यात आपले कर्तव्य पार पाडत असतात. तसेच येणाऱ्या काळात श्रीराम नवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती असे सणोत्सव देखील येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा आणि रात्री बेरात्री वीज पुरवठा खंडित होत असतो. बऱ्याच वेळा तर ऐन रोजा सोडण्याच्या वेळी किंवा नमाज पठण वेळीच वीज नसते.
उन्हाळ्याचे दिवस, रमजान महिना, श्रीराम नवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती असे सणोत्सव लक्षात घेता नागरिकांचे हाल टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित करू नये. तसेच विजेचा लोड वाढता असले तर सर्वांशी चर्चा करून योग्य तो वेळ लोडशेडिंगसाठी निश्चित करावा, जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास फारसा जाणवणार नाही. आमच्या मागण्यांचा योग्य विचार करून योग्य कार्यवाही करावी असेही निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन देतेवेळी आरीफ देशमुख, अशफाक मिर्ज़ा, ज़ाकिर पठान, शरीफ़ बाबा, विजय निकम, अमजद पठान मजहर पठान, रियाज़ बागवान, जकी अहमद, सैफ पिंजारी, मोहसिन भिस्ती आदी उपस्थित होते.