फैजपूर प्रतिनिधी । अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी सन 1950 पुर्वीचा जाती उल्लेख असलेले कागदपत्र सक्त करण्यात येत असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. ही बाब ना. हरिभाऊ जावळे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि आदिवासी विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र देऊन, सन १९५० पूर्वीचा जाती उल्लेख असलेला पुराव्याचा आग्रह व सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देताना त्यांच्या कडे सन १९५० पूर्वीचा जातीचा उल्लेख असलेल्या कागद पत्रांची सक्ती करण्यात येत होते. या पुराव्याच्या मागणीमुळे कोळी समाजाला प्रमाणपत्र मिळण्यास मोठी अडचण निर्माण होत होती. प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच अनेक लाभार्थीना लाभापासून वंचीत राहत आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्याचे अप्पर सचिव यांच्याकडून संबंधित जळगाव, फैजपुर, अमळनेर, एरंडोल प्रांत यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. १९५० पूर्वीचा पुरावा हा सक्तीचा करण्यात येऊ नये, प्रतिज्ञापत्राचा योग्य विचार करण्यात यावा, अशा प्रमाणपत्र निगर्मीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी या पत्राद्वारे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. अशी भावना कोळी समाजातील लोकांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे कोळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नामदार हरिभाऊ जावळे यांचे या निमित्ताने आभार मानण्यात येत आहे.